Ad will apear here
Next
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी सदस्यता अभियानांतर्गत नाशिक येथील निफाड तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समता परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. 

पंचायत समितीचे उपसभापती गुरूदेव कांदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निफाडच्या महिलाध्यक्ष अश्विनी मोगल, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नामदेव शिंदे, राष्ट्रवादीचे माजी तालुका उपाध्यक्ष हरीश झालटे, मनसेचे माजी जिल्हा सरचिटणीस आशिष फिरोदिया यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


या वेळी भाजप प्रदेश चिटणीस लक्ष्मणराव सावजी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशबाबा पाटील, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादाभाऊ जाधव आणि निफाड तालुकाध्यक्ष संजय वाभळे उपस्थित होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZSKCC
Similar Posts
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल : भाजप १०० जागांवर, शिवसेना ६४ जागांवर आघाडीवर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल ...... २८८ मतदारसंघांची स्थिती (स. ११.१५ वाजता)
‘राष्ट्रवादी’कडून सहाणेंचा उमेदवारी अर्ज दाखल मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाशिक विधान परिषदेसाठी शिवाजी सहाणे यांचा उमेदवारी अर्ज दोन मे नाशिकच्या निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आला.
देशमुख, पाटील शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबई शिक्षक मतदारसंघात अनिलकुमार राजेसिंग देशमुख व नाशिक शिक्षक मतदारसंघात अनिकेत विजय पाटील यांना पक्षातर्फे उमेदवार म्हणून घोषित केले आहे,’ असे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे यांनी बुधवारी जाहीर केले.
नवाब मलिक यांचे बापट यांच्यावरील आरोप मागे पुणे : तूरडाळ प्रकरणात गिरीश बापट यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मागे घेतला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language